RSS Feed

गरज इतिहासाची विषयी
नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरुरी आहे. शिवाजी महाराजांनी परकीय शत्रुपासुन स्वराज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनार्‍याच्या रक्षणाची जबाबदारी मयनाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखाने उभारले. सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथे अरबस्थानचा सेनापती जनगेखान याला बोलून पानकोट येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिदधी या पासून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून कुलाब्याला सागरीदुर्ग बांधला,सिमेंट किंवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला हा किल्ला स्थापत्यकलेचा उत्त्म नमूना आहे.

अशा प्रकारे अनेक गोष्टींची गरज आजच्या युगला आहे, शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणली असती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्य होते . म्ह्णुन शिवाजी महाराज्याच्या स्वराज्याची व सुराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आजच्या युगाला
गरज आहे इतिहासची

English-Marathi Dictionary

शेर शिवा का छावा था।।

Posted by प्रशांत भोसले लेबले: , ,

एक ही शंभू राजा था
देश धरम पर मिटने वाला।
शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी।
एक ही शंभू राजा था।।
तेज:पुंज तेजस्वी आँखें।
निकल गयीं पर झुका नहीं।।
दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का।
दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।।
दोनो पैर कटे शंभू के।
ध्येय मार्ग से हटा नहीं।।
हाथ कटे तो क्या हुआ?।
सत्कर्म कभी छुटा नहीं।।
जिव्हा कटी, खून बहाया।
धरम का सौदा किया नहीं।।
शिवाजी का बेटा था वह।
गलत राह पर चला नहीं।।
वर्ष तीन सौ बीत गये अब।
शंभू के बलिदान को।।
कौन जीता, कौन हारा।
पूछ लो संसार को।।
कोटि कोटि कंठो में तेरा।
आज जयजयकार है।।
अमर शंभू तू अमर हो गया।
तेरी जयजयकार है।।
मातृभूमि के चरण कमलपर।
जीवन पुष्प चढाया था।।
                                                                                                                            है दुजा दुनिया में कोई।
                                                                                                                            जैसा शंभू राजा था?।।

" YOU ARE NEVER LOOSER UNTIL YOU QUIT TRYING"

Posted by प्रशांत भोसले लेबले:

राजू बाबांसोबत सर्कस पाहायला गेला. तिकिटांच्या रांगेत असताना त्याची नजरसाखळीला बांधलेल्या हत्तीच्या पिल्लाकडे गेली.ते हत्तीचे पिल्लू जोरजोराने धडक देत तर कधी सर्व शक्ती लावून साखळी तोडण्याचाप्रयत्न करत होते. परंतु त्याला यश येत नव्हते. शेजारी त्याच्या आईलाही तशाचसाखळीने बांधून ठेवले होते. ती मात्र स्वस्तपणे उभी होती.राजूची उत्सुकता वाढली." बाबा, त्या हत्तीच्या पिल्लाला ती साखळी तोडणे कठीण आहे, पण त्याची आई तर तीसहज तोडू शकते ना? ती स्वताची व पिल्लाची सुटका का करून घेत नाही?"राजूच्या प्रश्नावर त्याचेबाबा निरुत्तर झाले पण तिथेउभा असलेला सर्कसच्याmanager ने तो प्रश्न ऐकला." त्याच अस आहे बाळा, ह्या हत्तीच्या आईलापण लहानअसताना इथे आणल गेल. तिलाही ह्याच साखळीला आम्ही बांधत असू. सुरवातीचे दोनमहिने ती देखील असाच सुटकेचा प्रयत्न करायची. ती साखळी तोडन आपल्या शक्तीबाहेरच आहे, अशी तिला जाणीव झाली. ती मोठी झाल्यावरही तिच्या मनात तेच बिंबूनगेलेय. अशा दहा साखल्याही ती सहज तोडू शकेल एवढी ताकत तिच्या अंगात आहे. पणपुन्हा प्रयत्न करायचा विचारही तिच्या मनात येत नाही. उलट तिला तिच्यापिल्लाचेच हसू येत असेल. "

आपलाही असाच होत मित्रांनो,एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर 'ते आपल्यालाजमणारनाही' अस मनात ठरवून चालतो. कालांतराने गोष्टी बदलतात. आता आपल्याला शक्यअसूनही आपण प्रयत्न करत नाही. कुणीतरी लिहिलंय........ ............

" YOU ARE NEVER LOOSER UNTIL YOU QUIT TRYING"विनोद चव्हाण *वसंताचं आगमन.

Posted by प्रशांत भोसले

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत.... गेली कीत्येक वर्षे तो रडलेला नाही.
एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला...


... खीशात दमडादेखील नसतांना तो लेखक फीरायला बाहेर पडतो.


त्याची नजर त्या भिका-याकडे आणी त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.


त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.


हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो..


"मित्रा, मी एक लेखक आहे,ज्याच्याकडे एक दमडादेखील नाही, पण मझ्याकडे कला आहे,...मझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.. ती मी तुला देउ शकतो...तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"


"साहेब" भिकारी म्हणतो " मझ्याशी कुणी बोलतदेखील नाही ...मी एक गरीब आंधळा भिकारी ...तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."


तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.


त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापूढ्यात पैसे टाकू लागलाय.


थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते...


तो भिकारी बेचैन होतो...नाण्यांची रास वाढतच जाते...


तो एव्हढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकचा हात पकडतो आणि म्हणतो " साहेब माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल ... मी एक गरीब आंधळा भिकारी आहे...मला कृपा करुन जर या पटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील."


तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो...


"वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी, आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."


भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.


आयुष्य कुणी जास्त जाणलं?


या ओळी लिहीणा-या लेखकानं? त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी? कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?

ते एक वडील असतात...

Posted by प्रशांत भोसले लेबले:

ते एक वडील असतात...
आई प्रेमाची नदी तर, वडील सागर असतात
खारट पाणी असूनसुद्धा ,सर्वाना समावून घेत असतात

घरातल्या सर्वांवर त्यांची, करडी नजर असते
मुले घरी वेळेवर नसली तर, गच्चीतच त्याची मूर्ती उभी असते

पोरांनी खूप मोठे झालेले पाहणे, हे त्याचे स्वप्न असते
त्यासाठी घरदार सोडून पळण, त्याच्या जिवालाच माहिती असते

नसेल प्रेम दाखवत तरी ,आतून वाहता झरा असतात
पोर जेवली का विचारल्याशिवाय ,ते ताटाला हात लावत नसतात

शाळा कॉलेज च्या प्रवेशासाठी, घाम टिपत रांगेत तेच उभ असतात
पैशाची जमवाजमव करत, तुटकी चप्पल पुन्हापुन्हा शिवत असतात

पोरग शाळेत जाऊ लागले कि, त्याला सायकल हवी असते
थोडी वरची पायरी चढल्यावर, त्याला बाइक नवी लागते

वडील आपल अजूनही ,बसच्या मागे पळत असतात
पोर नोकरीला लागल्यावर, आता चार चाकीच घेईन म्हणतात

मुलांची लग्न झाल्यावर, स्वेच्छा निवृत्ती घेईन म्हणतात
मुले नातवंडे परदेशी गेल्यावर रिकाम्या घरात, नोकरीला गेलेलेच बरे म्हणतात

चारचौघात कोडकौतुक करणार, ते एक वडील असतात
आई समईतील ज्योत, तर जळणारी फुलवात वडील असतात


शब्द रुपाली रंधवे कोल्हे

राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....

Posted by प्रशांत भोसले लेबले:


मराठी माणूस विसरून चाललाय


आपले मराठी पण


मराठी माणूस आपला विसरून


स्वाभिमान जगतोय क्न्हुन


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....स्वराज्य तुम्ही उभ केलत


तोरण्याचा पाया खणून


पण हे विसरून , मराठी माणसाचे


मराठीपण बसलय लपून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....पैसा - पैसा करतोय हर एक मनुष्य


आपले लबाडपण दडवून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....कायदा फसलाय मोठ्याच्या घरात


कारण तिथे असते पैशांची वरात


म्हणून कायदा खातोय त्यांचा चारा


कारण त्यांच्या भोवती


लागलाय पैशांचा पहारा


आणि यात जातोय


गरीब मरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....तुमच्या काळात मराठी मावळा


मनी ठेवायचा विचार


'' जिंकू किवा मरू ''


पण आजचे काही मराठी संपून


चाललेत पिऊन दारू


आणि आम्ही हे पाहतोय केवळ


डोळे भरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....तुम्ही उभ केलत मराठी साम्राज्य


कपाळी आई भवानीचा मळवट


भरून


एवढे गड जिंकले


कपाळी भंडारा माखून


आणि कइक मावळ्यांचे रक्त सांडून


पण आज मराठी माणूस हे


विसरत चाललाय पैशाचा मोह धरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....तुम्ही नसता तर, उभ राहिला


नसत आज मराठीपण


मग कसा राहिला असता आज


मराठी माणूस मान वर करून


आणि हेच नेमक तो चाललाय विसरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....म्हणून राजे तुमच्या चरणी एकच प्रार्थना


याव तुम्ही पुन्हा जन्माला!!


आणि सांगावा अर्थ मराठी माणसाला


आपल्या मराठी पणाचा...........