गरज इतिहासाची विषयी
नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरुरी आहे. शिवाजी महाराजांनी परकीय शत्रुपासुन स्वराज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनार्‍याच्या रक्षणाची जबाबदारी मयनाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखाने उभारले. सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथे अरबस्थानचा सेनापती जनगेखान याला बोलून पानकोट येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिदधी या पासून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून कुलाब्याला सागरीदुर्ग बांधला,सिमेंट किंवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला हा किल्ला स्थापत्यकलेचा उत्त्म नमूना आहे.

अशा प्रकारे अनेक गोष्टींची गरज आजच्या युगला आहे, शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणली असती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्य होते . म्ह्णुन शिवाजी महाराज्याच्या स्वराज्याची व सुराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आजच्या युगाला
गरज आहे इतिहासची

English-Marathi Dictionary

राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....

Posted by प्रशांत भोसले लेबले:


मराठी माणूस विसरून चाललाय


आपले मराठी पण


मराठी माणूस आपला विसरून


स्वाभिमान जगतोय क्न्हुन


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....स्वराज्य तुम्ही उभ केलत


तोरण्याचा पाया खणून


पण हे विसरून , मराठी माणसाचे


मराठीपण बसलय लपून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....पैसा - पैसा करतोय हर एक मनुष्य


आपले लबाडपण दडवून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....कायदा फसलाय मोठ्याच्या घरात


कारण तिथे असते पैशांची वरात


म्हणून कायदा खातोय त्यांचा चारा


कारण त्यांच्या भोवती


लागलाय पैशांचा पहारा


आणि यात जातोय


गरीब मरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....तुमच्या काळात मराठी मावळा


मनी ठेवायचा विचार


'' जिंकू किवा मरू ''


पण आजचे काही मराठी संपून


चाललेत पिऊन दारू


आणि आम्ही हे पाहतोय केवळ


डोळे भरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....तुम्ही उभ केलत मराठी साम्राज्य


कपाळी आई भवानीचा मळवट


भरून


एवढे गड जिंकले


कपाळी भंडारा माखून


आणि कइक मावळ्यांचे रक्त सांडून


पण आज मराठी माणूस हे


विसरत चाललाय पैशाचा मोह धरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....तुम्ही नसता तर, उभ राहिला


नसत आज मराठीपण


मग कसा राहिला असता आज


मराठी माणूस मान वर करून


आणि हेच नेमक तो चाललाय विसरून


राजे केवळ तुम्ही नाहीत म्हणून .....म्हणून राजे तुमच्या चरणी एकच प्रार्थना


याव तुम्ही पुन्हा जन्माला!!


आणि सांगावा अर्थ मराठी माणसाला


आपल्या मराठी पणाचा...........

0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment