जलदुर्गाचे आकर्षण लहान पणापासुन होते. लांब समुद्रात एखादा किल्ला बांधणे म्हणजे जिकरीचे काम असते. त्याकाळात असणारे जुणे तंत्र वापरुन किल्ला बांधणे म्हणजे अजुनच कठीण काम असे.
असा जलदुर्गाचा राजा असणारा हा जंजिरा,अनेक परकियाना ही ज्याचे आकर्षण होते व लढाईने जिंकता न आलेला असा हा अभेद्य किल्ला म्हणजे जंजिरा, राम पाटील ह्या कोळ्याने समुद्री चाच्यापासुन रक्षण व्हावे म्हणुन राजापुरच्या खाडीवर उभारलेला लाकडी मेढेकोट बांधलेला असा हा जंजिरा. शिवाजी महाराजानी चार वेळा प्रयत्न करुनही थोडक्यात हातातुन निसटलेला असा हा जंजिरा किल्ला.संभाजी महाराजाच्या हातात जंजिरा येत आहे हे पाहुन ऒरंगजेबाने हसनअली या सरदारला चाळीस हजाराची फ़ॊज घेऊन कल्याण भिंवडीच्या मार्गे रायगडाच्या दिशेने पाठवले.त्यामुळे नाईलाजास्तव महाराजाना रायगडावर फ़िरावे लागले. असा हा संभाजी महाराज्याच्या ही हाती न आलेला जंजिरा. किल्ला मराठ्याच्या हाती जाऊ नये म्हणुन मोगल इंग्रज व पोर्तुगिजानी एकत्र आनणारा हा जंजिरा किल्ला.
ह्या किल्ला पर्यत तीन मार्गाने जाता येत. अलिबागहुन रेवंडा मार्गे मुरुड गावात उतरावे. व बोट मार्गे जंजिरापर्यत पोहचता येते.
दुसरा मार्ग अलिबाग-पाली-रोहा नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.ह्या मार्गामध्ये पालीच्या गणपतीचेही दर्शन होते.
तिसरा मार्ग श्रीवर्धन दिवेआगार मार्गे म्हसाळ्याला यावे व दिघी हे गाव गाठावे. दिघी गावातुन बोट मार्गे किल्ल्यावर जाता येत.किल्ल्यावर जाण्यासाठी सहसा शिडाच्या बोटीचा वापर करावा.मोटरबोटने लवकर पोहचता येते परंतु वारयाच्या सामना करत त्याच्या शक्तीच्या आधारवर किल्ल्यावर पोहचण्यात मजा काही ऒरच असते.लाटावर स्वार होऊन बोट वर खाली हलत जाते जसा जसा किल्ला जवळ येईल तशी उत्कंठा अधिकच वाढत जाते.किल्ल्यावर प्रवेश किल्यावर नजरेस भरतो तो बुलंद भक्कम असे महाप्रवेशद्वार .प्रवेश वर दोन्ही बाजुला काही शिलालेख व शिल्प कोरलेली आहेत.यामध्ये एक पारशी शिलालेख आढ्ळतो. महादरवाज्याच्या दोन्ही भिंतीवर काही विशिष्ट प्रकारचे चिन्ह कोरलेले आहे.यात वाघ आणि हत्ती दिसतात.वाघाने आपल्या चारी पायाखाली हत्तीना दाबुन धरले आहे.आणि शेपटीत आणि तोंडातही हत्तींना पकडले आहे.हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणुन ओळखले जाते.हे चिन्ह म्हणजे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतिक आहे. दोन्ही दरवाज्याच्या मध्ये पहारेकरयासाठी देवड्या आहेत.
महादरवाज्याच्या वरच्या भागात नगारखाना आहे.
सिद्धी कासम याने किल्ल्याभोवती २२ भरभक्कम बुरुजाची निर्मीती केली आहे. बुरुज तुलनेने मोठे आहेत.प्रत्येक बुरुजावर महाकाय तोफ़ा ठेवण्यात आल्या आहेत.बुरुजाच्याखाली सॆन्यासाठी देवडया बांधल्या आहेत. कलालबांगडी, चावडी, लांडा कासम ह्या त्या पॆकी तोफ़ा आहेत.कलालबांगडी ही किल्ल्यावरील सर्वात महाकाय तोफ़ा आहे.ही तोफ़ किल्ल्यावरच तयार केली असावी असे जाणकाराचे मत आहे. कलाल म्हणजे आगीचा गोळा आणि बांगडी म्हणजे धातुच्या पोकळ चकत्या..अशा अनेक चकत्या जोडून ही महाकाय तोफ़ तयार केली.ही तोफ़ महादरवाज्याच्या बाजुच्या बुरुजावर ठेवली आहे.ह्या तोफ़ा मुळेच शत्रुला जंजिरा जिकता आला नाही.
जंजिरयाचा आकार हा लंबवर्तुळाकार आहे.त्याची तटबंदी ही दगडी चिरयानी बांधली आहे.जंजिरा हा सात मजली होता,त्याचे खालील दोन मजले हे तळ्घराच्या स्वरुपात होते असे काहीचे मत आहे.
किल्ल्याच्या महादरवाज्यातुन आत गेल्यावर उजवीकडे खोली सारखे बांधकाम आहे याला पीरपंचायतन असे म्हणतात.ह्या वास्तुत पाच पीर आहेत म्हणुन त्याला पीरपंचायतन म्हटले जाते.या पीरपंचायतनाच्या पटागणांत काही वास्तु आहेत. पीरपंचायतन च्या पुढे गेल्यावर घोड्याचा पागा लागतो. येथुन बाहेर पडल्यावर समोर तीन मजली भक्कम इमारत दिसते.त्याला सुरुरखानचा वाडा असे म्हणतात.सुरुरखानहा पराक्रमी होताच पण रंगेलही होता.आपल्या हवेलीला त्यांने मस्त सजवले होते.वारा खेळता रहावा म्हणुन त्याने वाड्याला अनेक खिडक्यांची सोय केली होती.सुरुरखानाच्या वाडाच्या आजुबाजुला बालेकिल्ल्याची उद्वस्त इमारत पहायला मिळते.आज तेथे एक झेंडा वंदना साठी ऊभारलेला दिसुन येतो.बालेकिल्ल्याच्या बाजुलाच एक सुंदर विहीर आहे.
जंजिरा किल्ल्यावर उत्तरेस व दक्षिणेस असे गोड्यापाण्याचे दोन तलाव दिसतात.उत्तरेकडील तलावाचा व्यास हा २० मी. आहे.याच्या चारही बाजुला हॊद आहेत. चहुबाजुने समुद्र पसरलेला असुनही हे तलाव हे गोड्या पाण्याचे आहेत हे नवल.त्याकाळात संपुर्ण किल्ल्यावर याचा वापर केला जात असे.परंतु पर्यटकांनी केलेल्या कचरामुळे तलावाचे सॊदर्य नष्ट झाले आहे.
गडाच्या पश्चिमेला तटावरुन थोडे खाली उतरल्यावर एक बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा लगतो त्याला पश्चिम दरवाजा किंवा दर्या दरवाजा असे म्हणतात.संकटकाळी बाहेर पडण्यासाठी यांचा वापर केला जात असे.तसेच किल्ल्याच्या मुख्यप्रवेशदवाराच्या विरुध्द दिशेलाही एक दरवाजा पहायला मिळतो. मुख्यप्रवेशदवारापेक्षा यांचा आकार लहान आहे.परंतु मुख्यप्रवेशदवाराप्रमाणे याच्या दोन्ही बाजुला देवड्या आहेत. तसेच काही चिन्ह ही कोरलेली आढळुन येते.
जंजीरा हा मुगल स्थापत्त कलेचा नमुना आहे.गडावर केलेले घुमटाकार बांधकाम मुगल स्थापत्याची आठवण करुन देतो.किल्ला हा स्थापत्त्याचा नीट विचारच करुन केलेली दिसुन येते. २२ भक्कम बुरुज मुख्यप्रवेशदवार,
संकटकाळी बाहेर पडण्यासाठी बांधलेला दर्या दरवाजा सुरुरखानाचा वाडा इ. त्यांची उदाहरणे आहेत. त्याच प्रमाणे किल्ल्यावर शॊचालयाचे उदवस्थ अवशेष दिसुन येतात.
किल्ला अभेद्य राहण्याचे कारण होते त्यांचे भक्कम बुरूज व त्यावरील कलालबांगडी, चावडी, लांडा कासम या सारख्या महाकाय तोफ़ा.या तोफ़ानीच सिद्धाची शान राखली.
गरज इतिहासाची विषयी
नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरूरी आहे,शिवाजी महाराजनी परकीय शत्रुपसून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनर्याच्या रक्षणाची जबबदारी मयणाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखानेउभारले.सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथ अरब्स्तान सेनापती जनगेखान याला बोलून पानकोत येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिधी या पासून राज्याचे रक्षण वाहवे म्हणून कुलाब्यचा किल्ला बांधला,सिमेंट किवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला किल्ला नमूना आहे.
अशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे,शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणलीअसती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्या होतेअशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे
म्हणून वाटते
गरज इतिहासची





1 टिप्पणी(ण्या):
Chaan zhaaliye post ! Savistar mahiti shobhaa aankhin vaadhavatiye !!
Post a Comment