गरज इतिहासाची विषयी

नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरूरी आहे,शिवाजी महाराजनी परकीय शत्रुपसून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनर्‍याच्या रक्षणाची जबबदारी मयणाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखानेउभारले.सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथ अरब्स्तान सेनापती जनगेखान याला बोलून पानकोत येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिधी या पासून राज्याचे रक्षण वाहवे म्हणून कुलाब्यचा किल्ला बांधला,सिमेंट किवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला किल्ला नमूना आहे.

अशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे,शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणलीअसती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्या होतेअशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे

म्हणून वाटते



गरज इतिहासची

English-Marathi Dictionary

पुन्हा एकदा गर्जुदया जयघोष "हरहर महादेव"चा

Posted by प्रशांत भोसले लेबले: , ,


शिवाजी महाराजाचा युद्धनिती व राजनिती अप्रतिम होती.शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी ठोर भुमिका घेतल्याची दिसुन येते स्वराज्यविरोधी भुमिका घेतलेल्या जावळीचा चंद्र्राव मोरेचा बंदिबस्त केला. युद्ध ही केवळ हॊतात्मासाठी लढाईची नसुन त्यातुन काही निष्पण्ण व्हावे लागते अशी महाराजाची धारणा होती. युद्ध हे राजासाठी न करता स्वराज्यासाठी करावे ही भावना महाराजांनी मावळ्यामध्ये निर्माण केली.व असंख्य मावळे सॆनिक तयार केले. त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली. त्यातुनच जबर स्वामीनिष्ठा असलेली माणसे तयार झाली.
महाराजांनी गनिमी कावाच्या उपयोग करुन युध्दे जिंकली. गनिमी कावा म्हणजे प्रत्यक्ष शत्रु पुढे न जाता बेसावध शत्रुवर अचानकपणे हल्ला करणे होय.गनिमी कावाचा मुळ होते ते हरहर महादेव ची घोषणा, महादेव म्हणजे शंभु. शिवाजीलाही शंकराचा अवतार मावळे मानत असत. हरहर महादेव ह्या शब्दाने मावळ्यामध्ये स्फ़ुरण चढत असे कित्येक मॆलाचा प्रवास करुन मावळे लढाई साठी सज्ज राहत. हरहर महादेवची घोषणा पुन्हा तवटवीत करत असे.शेकडो मावळे हरहर महादेवची घोषणा करुन हजारो शत्रुवर तुटुन पडत असत.संपुर्ण आसमंत हरहर महादेवच्या घोषणेने दुमदुमुन जात असत.समोरच्या बेसावध शत्रु गोंधळुन जात. व मावळ्याना
किल्ला जिंकणे सोपे जात असे . हरहर महादेवची घोषणा केल्या वर मावळे एकत्रित पणे हल्ला केल्याने शत्रु भांबावुन सोड्त. कोंडाणा जिंकताना बाजीने आपला भावाला कल्याण दरवाजाने वर पाठवले तर स्वतः निवडक मावळ्यासह डोणागिरी कड्यावरुन चढुन गेले.
व हरहर महादेवची घोषणा करुन दोन्ही बाजुनी शत्रुवर हल्ला चढवला.कितीतरी असाध्य किल्ले या हरहर महादेवची घोषणा करुन जिंकले त्या शब्दात वेगळी शक्ती होती त्याच हरहर महादेवची घोषणेनी बाजीप्रभुचे प्राण राजे विशालगडावर पोहचेपर्यंत अडवुन ठेवले होते. हरहर महादेवची घोषणा करुन बाजी शेवटपर्यंत लढत राहीले.

पंरतु आजच्या युगात लोक हरहर महादेव ची घोषणा विसरलेले दिसतात. पुन्हा एकदा हरहर महादेवच्या घोषणेचे चॆतन्य निर्माण करण्याची वेळ आली आहे. १९९९ साली अतिरेक्यानी आपले विमान अपहरण करुन काठमाडुहुन कंदहारला नेले.१५७ जणाचे अपहरण फ़क्त चार दहशतवादी करतात व बाकीचे १५७ जण त्याच्या दबावापुढे गप्प बसतात.इतिहासात विरुध्द घटना घडला जेव्हा प्रतापराव गुजराने बहलोलखानला सोडुन दिले त्या वेळी राजानी प्रतापरावाना खडसावित पत्र पाठविले "स्वराज्यावर वारवांर चाल करुन येणारया बहलोलखानचा बंदोबस्त केल्या शिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवु नये" ही आज्ञा मिळ्ताच प्रतापराव आपल्या सात मावळ्यासह हजारोच्या सॆन्यावर तुटुन पडले. परतु आता फ़क्त चॊघेजण १५७ जणाला बंदी बनवतात,त्याच्याकडे आधुनिक शस्त्रे असतील परंतु एकत्रपणे त्याच्यावर हल्ला चढवला असता तर तर त्याचा निभाव लागणे कठीण होते. त्याचप्रकारे २६/११ ला दहा दहशतवादी तीन दिवस आख्या मुबईला वेठीस ध्ररतात व आपण काही करु शकत नाही. आपल्यातलाच तुकाराम ओंबळे सारखा शुर शिपाई कसाबच्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलुन कसाबला जिंवत पकडण्यासाठी प्राणाची आहुती देतो. ज्यावेळी अतिरेक्यानी सी.एस.टी वर गोळीबार करत होते त्याचवेळी आपण त्याच्यावर हल्ला करु शकत होतो. पण आता आपली मानसिकता बदलली आहे. आपल्या पुरते जगणे सुरु आहे त्यामुळे असे प्रसंग घडतात.मराठी माणसाने तरी असे प्रसंग परत कधी घडल्यास गोंधळुन न जाता आपला ईतिहास आठवत हरहर महादेव म्हणुन देशाच्या शत्रुवर एकत्रपणे तुटुन पडले पाहिजे. व शत्रुला सडेतोड उत्तर दिले पाहीजे.त्या हरहर महादेवाच्या शब्दात खुप मोठी प्रेरणा आहे. इतिहासात तर शेकडो मावळे हजारोच्या सॆन्यावर तुटुन पडत परंतु आज आपण लाखोजण मोजक्या शत्रुवर हल्ला चढविणे कठीण नाही.
म्हणुन सांगावेसे वाटते.
पुन्हा एकदा गर्जुदया जयघोष "हरहर महादेव"चा

0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment