गरज इतिहासाची विषयी

नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरूरी आहे,शिवाजी महाराजनी परकीय शत्रुपसून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनर्‍याच्या रक्षणाची जबबदारी मयणाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखानेउभारले.सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथ अरब्स्तान सेनापती जनगेखान याला बोलून पानकोत येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिधी या पासून राज्याचे रक्षण वाहवे म्हणून कुलाब्यचा किल्ला बांधला,सिमेंट किवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला किल्ला नमूना आहे.

अशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे,शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणलीअसती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्या होतेअशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे

म्हणून वाटते



गरज इतिहासची

English-Marathi Dictionary

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,जाणावा विठ्ठल प्रेम भावे ।

Posted by प्रशांत भोसले लेबले: ,

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवी वरा पाहु
डोळे निवतील ताण, मना तेथे समाधान
जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल, विठ्ठल

आषाढ महिना चालु झाला की सर्व महाराष्ट्राला वेध लागतात ते विठ्ठल वारी चे जास्त करुन शेतकरी राजा विठ्ठल दर्शनासाठी असुसलेला असतो, नुकताच पवसाळा चालु झाल्याने पेरणी करुन शेतीची काळजी वरुणराजा वर सोपवुन निश्चिंत मनाने शेतकरी विठुरायाच्या भेटीसाठी वारीत सहभागी होतो.
महाराष्ट्रातुन अनेक वारया ह्या पंढरपुर कडे रवाना होतात व आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरला जमतात।वारयामध्ये दोन वारी ह्या प्रमुख आहेत. पहिली ज्ञानेश्वर माऊली ची ती आळंदी वरुन जेजुरी मार्गे पंढरपुरात जाते. तर दुसरी पालखी ही तुकारामाची ती देहु वरुन निघुन पाटस मार्गे पंढरपुरात जाते.दोन्ही वारयाचे पुण्यात एक दिवसाचा मुक्काम असतो.या दोन दिवसात पुण्यात जय्यत तयारी केली जाते.
"साधु संत येता घरा, तोचि दिवाळी दसरा"

उक्ती प्रमाणे पुण्यनगरीतील लोक वारकरयाच्या सेवेत लीन होतात.ज्याला वारीला जायला जमत नाही त्यांनी पाच वारकरी जेऊ घालावे अशी लोकांची समजुत आहे.पुण्यातील अनेक मंडळे ही वारकरयाच्या दिडीची सोय करतात,त्यांना जेऊ घालण्याबरोबरच त्यांना पुढच्या प्रवासासाठी लागणारया साहित्याचे वाटप केले जाते.त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्र्स्टचे वॆदकीय पथक कायम वारी सोबत राहुन वारकरयाच्या आरोग्याची काळजी घेतात.पालखीचा मुक्काम ज्या गावात असतो त्या गावचे लोकही दिंडीची व्यवथ्या करतात.
वारीमध्ये जाणारे लोक हे वारकरी म्हणुन ओळखले जातात।पालखी सोहळ्यात जाणारे वारकरी हे दोन प्रकाराचे असतात।पहिल्या प्रकारात दिंडी मधुन जाणारे वारकरी असतात तर दुसरया प्रकारात स्वतंत्रपणे जाणारे वारकरी असतात.



बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,जाणावा विठ्ठल प्रेम भावे ।
जनसामान्य माणसाचे दॆवत आसणारा विठोबा,सर्वाना हवाहवासा वाटणारा विठ्ठल,त्याच्या एका क्षणा दर्शनासाठी २२५ किलोमीटरचा प्रवास करुन येणारा वारकरी संप्रदाय़,किती-किती वॆशिष्टे या सावळ्या सुकुमार विठ्ठलाचे आहेत.असा हा महाराष्ट्राबरोबर कर्नाटकात ही लोकप्रिय असणारा विठ्ठल आहे.
विठ्ठलाचे सावळे सगुण रुप सर्वाना आपलेसे वाटते.सामान्याचा देव म्हणुन विठ्ठलाची ख्याती आहे. विठ्ठल हा क्रुष्णाचा अवतार मानला जातो.य़ा संबंधी एक आख्यायिका सागितली जाते की एकदा कृष्णा हे आपल्या महालात बसला होते.त्यावेळी त्याच्या सोबत राधा ही बसलेली होती,रुक्मिणीने हे दृष्य पाहिले व रुक्मिणी रागाने दिंडीवनात निघुन आली.तिचा रुसवा काढण्यासाठी विठ्ठल दिंडीवनात आले येऊन पोहचले,व तिची समजुत काढली.व पुढे ते पुंडलिक भेटीसाठी निघुन गेले.पंरतु पुंडलिक हा मातापिताच्या सेवेत व्यस्त होता म्हणुन त्याने विठ्ठलाच्या बाजुला विट फ़ेकली अशाप्रकारे विठ्ठल हे पुंडलिकाची वाट पाहत विटेवरी ऊभा आहे.भक्ताची वाट पाहत थाबलेला "युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा" असा हा निराळा विठ्ठल....

पंढरीतील ही यादव पुर्व काळातील जवळपास ५व्या ६व्या शतकातील असावी।मुर्तीची घडण ही वालुकाश्म दगडची आहे.तिची ऊंची सुमारे ३फ़ुट ९इंच आहे.त्याचा वर्ण हा संपुर्ण काळा नसुन करडा(सावळा) आहे.मुकूट पारशी लोकांच्या टोपी सारखा आहे.त्याला शिवलिंग म्हणतात. चेहरा हा नाजुक सुकुमार असुन आकाराने लहान आहे आहे तो किंचीत उभट आहे, मुकुटामुळे तो उभट वाटतो.गाल हे गोल असुन कानात मोठी मत्स्याकार कुंड्ली आहेत.ती खाद्यापर्यंत लोबती आहेत.गळ्यात कॊस्तुभमण्याचा कंठा कोरलेला आहे.छातीवर भृगुलांच्छन चिन्ह आहे. दंडात बाहुभूषण कडी आहेत.मनगटात दोन कडी आहेत.कमरेला तीन पदरी मेखला असुन त्याचा सोगा पायापाशी लोळ्त आहे.दोन्ही हात हे कमरेभोवती असुन डाव्या हातात शंख व उजव्या हातात कमळपुष्प आहे.पायाच्या मधोमध घुंघुरवाळी काठी आहे.ही काठी कृष्णा अवताराचे प्रतिक मानले जाते,विठ्ठलाच्या पायाच्या मध्ये एक खोलगट खड्डा पड्लेला आहे त्या विषयी असे सागण्यात येते की फ़ार वर्षापुर्वी मयुकेशनी नावाची अप्सरा होती तिला आपल्या सॊदर्यावर खुप गर्व होता. ती अप्सरा विठ्ठल दर्शनाला आल्यावर तिला विठ्ठलाचे पाय खुपच नाजुक लागले तिने पायाना स्पर्श करतात तेथुन रक्त वाहु लागले.यामुळे अप्स्ररेचा गर्व कमी झाला.व त्यांची खुण म्हणुन विठ्ठलाच्या तळ्व्याच्या वरील बाजुला खड्डा आहे. असे ते


सावळे सगुण ते रुप हरीचे,
पाहुनी या मन भुलले,त्याने भक्तांना वेड लावले,
सावळे सगुण ते रुप हरीचे,
चंद्रभागेच्या तिरी मंदीरी,ऊभी विटेवरी मुर्ती साजिरी,
दर्शना होता मात्र तयाचे, जुळती कर आपुले,
त्याने भक्तांना वेड लावले,सावळे सगुण ते रुप हरीचे,
मुकुट शिरी अन कानी कुंडल,शांत मुखावर दिव्या योगबळ.
दृष्टी भिडता तेथ थबकती, भक्ताची पाऊले,
त्याने भक्तांना वेड लावले,सावळे सगुण ते रुप हरीचे,


विठ्ठलाचा दरबारात सर्व जण सारखे असतात.सर्व जाती धर्माचे तसेच उच्च निच लोक विठ्ठल दर्शनाला येतात.विठ्ठलहा जनसामान्य देव आहे. त्याची सावळी काया सामान्य माणसाप्रमाने आहे त्या मुळे तो आपल्यातील एक होऊन जाते.भक्ताचे व त्याचे नाते निराळेच असते.जशी आई आपल्या मुलाची वाट कमरेवर ठेऊन ऊभी असते त्या प्रमाणे विठ्ठल ही करकटावरी ठेऊन भक्तांची वाट पाहत ऊभा आहे.भक्तांचे व विठ्ठलाचे नाते एवढे दृढ आहे की, भक्त विठ्ठलाचा आपुलकीने एकेरी उल्लेख करतात,भक्त विठ्ठलाला कानड्या, पाडुरंग, सावळ्या, विठाबाई, विठोबा अशी अनेक नावानी हाक मारतात.सामान्याचा घरी नकळतपणे येउन राबणारा देव अशी विठ्ठलाची ख्याती आहे.विठ्ठलाची मुर्ती ही कमरेवर हात ठेऊन स्थिर व ताठ ऊभी आहे.व चेहरा स्मित हास्याने खुलला आहे.जणु तो भक्तांना सांगत मी सदॆव जागता पहारा ठेऊन तुमच्या मदती साठी तयार आहे.तुम्ही निश्चिंत मनाने काम करत रहा.संकटाच्या काळात माझ्या प्रमाणे स्थिर उभे राहुन स्मित हास्याने त्याचा सामना करा.

0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment