गरज इतिहासाची विषयी

नव्या युगात प्रवेश करताना इतिहासाचे अवलोकन करणे जरूरी आहे,शिवाजी महाराजनी परकीय शत्रुपसून राज्याचे रक्षण व्हावे म्हणून नाविक दल उभारले. सागरी किनर्‍याच्या रक्षणाची जबबदारी मयणाथ भंडारी आणि वंताजी भाटकर या दोन भावावर सोपवली.पुढे संभाजी महाराजनी महाड,राजापूर,जाईतपुर,कल्याण येथे जहाज बांधणी चे कारखानेउभारले.सैनिकाना आधुनिक तंत्र समजण्यासाठी तेथ अरब्स्तान सेनापती जनगेखान याला बोलून पानकोत येथे प्रक्षिषण दिले. इंग्रज आणि जंजिराच्या सिधी या पासून राज्याचे रक्षण वाहवे म्हणून कुलाब्यचा किल्ला बांधला,सिमेंट किवा चुना यांचा वापर ना करता बांधलेला किल्ला नमूना आहे.

अशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे,शिवाजी महाराज्याच्या आरमाराची संकल्पना आज वापरात आणलीअसती तर 26/11 चा हल्ला होणे अशक्या होतेअशा प्रकारे अनेक गोस्टीची गरज आजच्या युगला आहे

म्हणून वाटते



गरज इतिहासची

English-Marathi Dictionary

समर्थ रामदास स्वामी

Posted by प्रशांत भोसले लेबले: , ,

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा"
"आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे"
"महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे"
रामदास स्वामी शिवकाळात महाराष्ट्राला मिळालेले थोर संत, वर्तमानचा व भविष्याचा वेध घेवुन आपले मत परखडपणे मांडणारे संत,इतर संत हे फ़क्त भक्ती व आहिसक मार्गवरुन चालणारे होते पंरतु रामदासांनी परिस्थिती प्रमाणे कसे वागावे हे शिकवले,
मना सज्जना तु कडेनेच जावे।
न होऊन कोणास दुख:वावे॥
कुणी दृष्ट अंगास लाविल हात।
तया दाखवावा भुजंगप्रयात॥
या श्लोकावरुन रामदासाचे विचार दिसुन येतात आपण कोणाच्याही वाटेला जाऊ नये,परंतु जर एखादा दृष्ट अंगावर आला तर आपण शांत न बसता त्याला योग्य उत्तर हे दिलेच पाहीजे. त्याच बरोबर वाईट प्रसंगी डोके शांत ठेउन पुढील पावले उचलली पाहिजेत ही शिकवण समर्थानी दिली.रामदासानी संभाजी पाठवलेले उपदेशपर पत्रामध्ये रामदास स्वामी सांगतात,
अखंड सावधान असावें। दुश्चित कदापि नसावें।
तजविण करीत बसावें। एकांत स्थळी॥१॥
कांहीं उग्र स्थिति सोडावी। कांहीं सॊम्यता धरावी।
चिंता पराची लगावी। अंतर्यामी॥२॥
रामदास स्वामींचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी असलेल्या जांब या गावी झाला.त्याचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला.रामदासाचे मुळ नाव हे नारायण होते, परंतु ते स्व:ताला रामाचे दास समजत म्हणुन त्यांना लोक रामदास स्वामी म्हणु लागले.त्यांनी दासबोध या ग्रंथाची निर्मीती केली. तसेच मनाचे श्लोकातुन सदविचार व सदवर्तन यांची शिकवण दिली.बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदीरे बांधली.लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले.’सामर्थ आहे चळवळीचे, जो करील तयाचे’हा संदेश त्यांनी दिला. अन्यायाविरुदध प्रतिकार करण्यांची स्फ़ुर्ती त्यांनी दिली.
त्याकाळी शिवाजींनी लोकांच्या हातात तरवार देऊन लढायला तयार केले तर रामदासस्वामीनी वॆचारिकपणे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करुन दिली.शिवाजी महाराजांसारखा पुरुष पहिल्यावर तळमळ वाटुन ते तुळजाभवानीची प्रार्थना करतात की,’तुझा तु वाढवी राजा, शीघ्र आम्हीही देखता.पुढे शिवाजींनी मुस्लिमाचा पराभव करुन स्वराज्याची स्थापना केली.तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु येऊन उदगार काढले,’बुडला ऒरंग्या पाणी, मत्तसंहार जाहला, मोडिली मोडिली छत्रे आनंदभुवनी’. महाराष्ट्र धर्म प्रसारासाठी त्यांनी महान कार्य केले.त्याच्या या धर्माचे सार हे,"मुख्य ते हरीकथानिरुपण,दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी".धर्मप्रसारसाठी त्यांनी ११०० मठांची स्थापना करुन आपल्या शिष्यांची योजना केली.
रामदास स्वामींनी ही राजकारणावर लक्ष दिले. शिवाजी महाराजाची व रामदास स्वामीची भेट झाली का नाही यावर वाद आसला तरी दोघाचे उदिष्ट हे एकच होते.रामदासानी संभाजी पाठवलेले पत्र प्रसिद्ध आहे त्यात रामदास स्वामी अस्वस्थ संभाजी आपल्या पित्याची आठवण करुन देताना म्हणतात,

"शिवराजांचें आठवावे रुप। शिवाराजाचा आठवावा साक्षेप।
शिवरायाचा आठवावा प्रताप। या भुमंडळी॥१८॥
शिवरायांचे कॆसें बोलणें। शिवरायांचे कॆसें चालणे।
शिवरायाचे सलगी देणें। कॆसी असे॥१९॥
सकळ सुखाचा केला त्याग। करुनी साधिजे योग।
राज्य साधनेची लगबग। कॆसी केली॥२०॥
त्याहु्नि करावें विशेष। तरी च म्हणवावें पुरुष।
या उपरी आतां विशेष। काय लिहावें॥२१॥
अशाप्रकारे रामदास स्वामी स्वराज्याच्या छ्त्रपतीला डिवचतात की तुमच्या पित्यानी किती कष्टांनी स्वराज्य स्थापन केले,त्यांची आठवण ठेऊन आपण त्यांच्या पेक्षाही अधिक पराक्रम गाजवावा तरच आपण पुरुष म्हणुन घ्यावे. शेवटच्या श्लोकात ते म्हणतात की, तुम्ही समजदार आहात तुम्हाला अधिक काय सांगावे.तुम्ही योग्य तो निर्णय़ घ्यावा.

अशाप्रकारे समर्थ रामदास स्वामी यांच्या उपदेशांची जोड लाभल्यामुळे स्वराज्य स्थापनेची तीव्र आकांक्षा व ती सिध्दीस नेण्यात लागणारे लष्करी सामर्थ्य ही दोन्ही एकाच वेळी महाराष्ट्रात तयार झाली व त्याच वेळी तिचा उपयोग करुन घेणारा शिवाजीराजांसारखा पुढारीही महाराष्ट्रात निर्माण झाला. त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.आजच्या युगात समर्थाचे मनाचे श्लोक पाठ करुन ते आचरणात आणले तरी खुप मोठा बद्ल घडल्याशिवाय राहणार नाही.

6 टिप्पणी(ण्या):

  1. Tushar Kulkarni

    Nice One !!
    Keep writing.

  1. Maria Mcclain

    Your blog is really cool and good for viewer, you should try to submit your blog in website for advertising and marketing and see how you get the traffic to your blog.

  1. Anonymous

    Shivrayache Atahvave Rup
    Shivarayacha Atahvava Pratap
    Bhumandali....

  1. Anonymous

    Anatkoti Bramhadnayak Rajadhiraj Yogiraj Samarth Sadguru Swami Samarth Maharaj ki Jay, Jay Jay Jay!

    Jay Shivaji Maharaj

  1. om

    this is not telling true story,
    please find the information of sajjan gadh fort, who is the ruler at the time of Ramadas stay at Sajjan gadh.

  1. om

    shiv shahir purandhare also accept that there is no any relation between ramdas and shivaji maharaj as per the documents available

Post a Comment